Site icon

नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या पाच संशयितांच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील डेटा नष्ट केल्या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या संशयित उनैस उमर हयाम पटेल (32, रा. जळगाव) याची 14 दिवसांची कोठडी संपल्याने नाशिक न्यायालयाने संशयित पटेलची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून ‘पीएफआय’ संघटनेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने लक्ष केंद्रित केले असून, नाशिक एटीएसने आतापर्यंत सहा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये ‘पीएफआय’चे मालेगाव जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (27, रा. हुडको कॉलनी) याच्यासह पुण्यातील उपाध्यक्ष अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (48, रा. कोंढवा), वरिष्ठ नेता रझी अहमद खान (37, रा. कोंढवा खुर्द), सदस्य वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (29, रा. अझीझपुरा, बीड) आणि विभागीय सचिव मौला नबीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. देशविघातक कारवायांसह समाजात अशांतता पटेलची कारागृहात रवानगी पसरविण्याच्या आरोपाखाली संशयितांना अटक करण्यात आली, तर संशयितांकडून मोबाइल, कॉम्प्युटरसह हार्डडिस्क जप्त केल्यानंतर काही आक्षेपार्ह माहिती समोर आली होती. यातील काही माहिती तत्पूर्वीच नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून सहावा संशयित उनैस पटेलला अटक करण्यात आली होती. 14 दिवसांच्या कोठडीनंतर पटेलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या तपासात पटेलने नष्ट केलेला डेटा मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Exit mobile version