नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन

जुन्या पेन्शन योजना

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

येथील भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयाच्या वतीने पेन्शनधारकांना पेन्शन बंद झालेल्या लाभार्थींना विशेष आवाहन केले आहे. पेन्शनधारकांच्या मृत्यूपश्चात, वारसदार म्हणून विधवा, विदुर पेन्शनधारक व त्यांच्या मुलांचे वय 25 पेक्षा कमी वयाचे आहेत. परंतु त्यांची मासिक पेन्शन बंद झाली आहे. त्यांनी त्यांचे हयात असल्याचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन न केल्यामुळे पेन्शन बंद झाली आहे. पेन्शनधारकांनी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आपण पेन्शन घेत असलेल्या बँकेत जाऊन डिजिटल हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) अपलोड करावा, असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी अनिलकुमार प्रीतम यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन appeared first on पुढारी.