
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील विद्यार्थीनी आकांक्षा बाळासाहेब गोडसे हीला महाराष्ट्र शासनाची एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. याकरीता महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांनी शासनाच्या मदतीसाठी पाठपुरावा केला होता. महाविद्यालयाने केलेल्या या पाठपुराव्यामुळे मदत मिळाल्याने गोडसे कुटूंबियांनी शासन व महाविद्यालयाचे आभार मानले.
आकांक्षा गोडसे ही सध्या एफवायबीएच्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे मातृछत्र हरपल्याने प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी तिला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी आकांक्षा हीने अभ्यासवर लक्ष केंद्रीत करुन शिक्षणावर भर द्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डी. टी. जाधव, श्याम जाधव, पी. सी. गांगुर्डे, उर्मिला गिते, डॉ. मणिषा आहेर, श्वेता श्रीमाळी आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- पिंपरी-चिंचवड पालिका उभारणार घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र
- पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास नारायणगाव पोलिसांकडून अटक
- ‘गो फर्स्ट’ च्या दिवाळखोरीमुळे हवाई प्रवास महागणार?
The post नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत appeared first on पुढारी.