
नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमाराला नाशिक पुणे रस्त्यावरील शिंदे टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणी रद्द करावी अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. एक तास आंदोलन झाले. नाशिकरोड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
मागील काही दिवसांपासून कांद्याचे वाढते दर लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो आयात करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. हे दोन्हीही निर्णय शेतकरी विरोधात असून यामुळे कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप करित हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या शरद पवार गटाने केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करीत घोषणाबाजी केली. जवळपास पाऊण तास नाशिक – पुणे रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याचे दिसत होते. नाशिकरोड पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान आंदोलनामुळे वाहनधारकांना त्रास झाला. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ नेते कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, गणेश गायधनी दिनेश धात्रक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिनेश धात्रक, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष कुमार गायधनी, गणेश आगळे, गणेश जाधव, जयराम शिंदे, राजाराम मुरकुटे आदी उपस्थिती होते.
हेही वाचा :
- आ. अतुल बेनके कृषिमंत्र्यांसोबत ; दिल्लीत भूमिकेवरून शेतकर्यांमध्ये चर्चा सुरू
- Chandrayaan-3 Mission | ब्रेकिंग! चांद्रयान-३ आजच चंद्रावर उतरणार; इस्रोने दिली मोठी अपडेट
- Chandrayaan 3 Moon Landing | इतिहास घडवण्यासाठी अवघे काही तास बाकी; चांद्रयान-३ मोहिमेला द्या ‘या’ शुभेच्छा अन् संदेश
The post नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.