नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी ‘कोकण रेल्वे‘ इच्छूक; काम मिळवण्यासाठी हालचाली गतीमान

नाशिक : केंद्र आणि राज्य शासनाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाच्या उभारणीसाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ही नामवंत कंपनी प्रयत्नशील आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे काम मिळाल्यास, कमी वेळेत आणि कमी खर्चात हे काम पूर्ण करण्याबाबत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीने उत्सुकता दाखविली आहे. 

कोकण रेल्वेचे व्यवस्थापकिय संचालक तथा, चेअरमन संजय गुप्ता यांनी केंद्र तसेच राज्याचे वाहतूक आणि बंदरे मंत्रालयाचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांना कोकण रेल्वे कार्पोरेशनने पत्र दिले असून, त्यात, कोकण रेल्वे कार्पोरेशनकडे अद्यावत साधन, सामुग्री असून जम्मू-काश्मीर या उंच डोगंरी भागातही रेल्वेच्या कामाचा अनुभव नाशिक-पुणे रेल्वे मार्ग उभारणीसाठी उपयोगात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन प्रशासानाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

तब्बल १६ हजार कोटींचा खर्च

नाशिक-पुणे-मुंबई ही महाराष्ट्रातील तीन अतिमहत्त्वाची शहरे या रेल्वेमार्गाने जोडली जाणार असल्याने महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील विकासाला गती येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या लोहमार्गासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र आणि राज्यशासनाने नुकतीच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च येणार असून पैकी राज्य आणि केंद्र शासन प्रत्येकी २० टक्के तर ६० टक्के विविध कंपनींच्या भागभांडवलातून उपलब्ध होणार आहेत. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

लोहमार्गाच्या कामासाठी हालचाली गतीमान

मात्र, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग उभारणीचे काम सर्वात मोठे असल्याने काम कुणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. रेल्वेमार्ग तसेच कोकण किनारीचे आणि डोंगर दऱ्यांत बोगदे काढून लोहमार्ग उभारणीचा कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमीटेड कंपनीला अनुभव आहे. या कंपनीने मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अतिशय खडतर ठिकाणी रेल्वेसाठी बोगदे तयार करतांनाच, जम्मू-कश्मीर सारख्या उंच डोंगर दऱ्याच्या परिसरात रेल्वे मार्ग उभारले आहेत. या अनुभवाच्या जोरावर कंपनीने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड लोहमार्गाच्या कामासाठी हालचाली गतीमान केल्या आहेत. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे लेखी प्रयत्न सुरु केले आहेत. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प उभारणीचे काम कमीत-कमी खर्चात व वेळेत पूर्ण करणार असल्याचा विश्वास कोकण रेल्वे कोर्पोरेशन कंपनीने शासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद केला आहे