नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली ‘विशाखा’, काका पोहून बाहेर आल्याने वाचले

आळंदी नदीच्या पुरात मुलगी वाहून गेली

नाशिक : (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा :

दिंडोरी तालुक्यात कोचरगाव येथे पूराच्या पाण्यात 6 वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. येथील आळंदी नदी पार करुन शेतातील घरी जात असताना विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी व तिचे काका भोलेनाथ केरु लिलके नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. त्यातून भोलेनाथ हे पोहून बाहेर आले. मात्र विशाखा नदीच्या पात्रात वाहून गेली आहे. गावातील ग्रामस्थ तीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली 'विशाखा', काका पोहून बाहेर आल्याने वाचले appeared first on पुढारी.