नाशिक : पूरात वाहून गेलेल्या ‘विशाखा’चा मृतदेह सापडला

मृतदेह,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी)  पुढारी वृत्तसेवा :

दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथे आळंदी नदीच्या पूराच्या पाण्यात विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी आपले काका भोलेनाथ केरु लिलके यांच्या सोबत नदी पार करुन शेतातील घरी जात असताना पूराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना दि.12 रोजी घडली. या घटनेत काका पोहून बाहेर आल्याने वाचले, मात्र विशाखा वाहून गेल्याने शोधकार्य सुरु होते.

अखेर आज दि. 15 सकाळी साडे दहा वाजता देवराम शिवा लिलके यांना आळंदी धरणाच्या फुगवट्यावर तीचा मृतदेह दिसला. पाण्यावर तरंगत असलेला विशाखा चा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून दिंडोरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पूरात वाहून गेलेल्या 'विशाखा'चा मृतदेह सापडला appeared first on पुढारी.