नाशिक : पॅरोलवरील फरार आरोपी वर्षभरानंतर गजाआड

गजाआड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पॅरोलवर कारागृहाबाहेर आलेला व वर्षभरापासून फरार झालेल्यास गुंडाविरोधी पथकाने पकडले आहे. अजय सुनील वडनेरे (३१, रा. उपनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. अजयला घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने मध्यवर्ती कारागृहातून शिक्षाबंदींना पॅरोलवर सोडण्यात आले होते. मात्र, पॅरोलची मुदत संपल्यानंतर त्यापैकी अनेक कैदी अद्याप कारागृहात आलेले नाहीत. त्यापैकी अजय वडनेरे हादेखील जून २०२२ मध्ये कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे तो फरार असल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिस अंमलदार गणेश भागवत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पेठ येथील ननाशी गाव येथे सापळा रचून अजयला पकडले. त्यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश सावकार, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : पॅरोलवरील फरार आरोपी वर्षभरानंतर गजाआड appeared first on पुढारी.