नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी

पेठ अपघात,www.pudhari.news

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा
पेठ तालुक्यातील पळशी-चिखली मार्गावरील चिखली गावानजीक उतारावर जीपचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन उलटे झाल्याने एका प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला, तर एका शाळकरी मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघतात 25 प्रवासी जखमी झाले.

पेठकडून चिखलीकडे प्रवासी वाहतूक करणारी क्रूजर (एमएच 10 ई 9389) ही चिखली गावानजीक एका उतारावरून जात असताना अपघात झाला. यात रामदास गायकवाड (55, रा. चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर धनराज लक्ष्मण पाडवी (15, रा. पळशी) या शाळकरी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघा गंभीर प्रवाशांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून, काही जखमींवर पेठ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे :
लक्ष्मण रामजी ठोंबरे (60, रा. चिखली), वसंत तुकाराम चौधरी (45, रा. चिखली), रेखा गणपत करवंदे (35, रा. चिखली), मोहन रामा जांजर (23, रा. चिखली), वामन महादू गायकवाड (35, रा. चिखली), देवीदास चिंतामण गाडर (15, रा. चिखली), मोतीराम नवसू भोये (65, रा. उंबरपाडा सु), मुरलीधर नारायण दोडके (52, रा. चिखली), शिवराम रतन दरोडे (40, रा. भुवन), लक्ष्मण काशीनाथ पाडवी (35, रा. पळशी), गोकुळ मोहन झांजर (7, रा. चिखली), मयूर काशीनाथ भवर (10, रा. चिखली), लक्ष्मीबाई येवाजी पवार (60, रा. चिखली), जिजाबाई महादू गाडर (65, रा. चिखली), कुसुम गणपत बाह्मणे (35, रा. फणसपाडा), साळूबाई किसन (60, रा. चिखली), मनी किसन मानभाव (70, रा. चिखली), पवना गणपत बाह्मणे (10, रा. फणसपाडा), वृषाली जनार्दन तुंबडे (13, रा. चिखली), अंजनी तुळशीराम भुसारे (48, चिखली), कमळीबाई हरी ढेपने (50, रा. चिखली), जयराम काशीराम गाडर (68, रा. चिखली), पुंडलिक कृष्णा गाडर (32, रा. चिखली), देवाजी र्त्यंबक भवर (60, रा. चिखली), हरी काशीराम ठेवणे (65, रा. चिखली) यांचा समावेश आहे. पेठ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे तपास करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी appeared first on पुढारी.