येवला; पुढारी वृत्तसेवा पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला नगरीमध्ये दिवाळीच्या आतिषबाजीमुळे एका पैठणी साडीच्या दुकानाला भीषण आग लागली. शहरातील फत्तेपुर नाका परिसरात छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग रस्त्यावरील हे पैठणी साडी विक्रीचे नाकोड पैठणी नाकोड फॅशन हे दुकान आहे. या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या दुकानाला लागलेल्या आगीतून काही सामान वाचवण्याचे प्रयत्न केले गेले, मात्र आगीच्या रुद्ररूपामुळे लाखो रुपयांची हानी झाल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक जनतेने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
The post नाशिक : पैठणी साडीच्या दुकानाला आग; लाखो रूपयांचे नुकसान appeared first on पुढारी.