नाशिक : पोलिसांकडून दोन पीडित महिलांची सुटका

नाशिक, सिडको : सिडकोत स्वतःच्या फायद्यासाठी दोन महिलांकडून अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या एकास अटक करत अंबड पोलिसांनी दोघा पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील बुरकुले हॉलच्या पाठीमागील एका एका रो- हाउसमध्ये संशयित धनंजय मोरे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून दोन महिलांच्या माध्यमातून अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय चालवत होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, स. पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, किशोर कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने छापा टाकून दोघा पीडितांची सुटका केली.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिसांकडून दोन पीडित महिलांची सुटका appeared first on पुढारी.