नाशिक : पोलिसांच्या छापेमारीत तीन दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा हस्तगत

मालेगाव मध्य www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि.31) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. प्राणघातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद झाली. तर दुसर्‍या कारवाईत द्याने शिवारात जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक अनिकेत भारती व उपअधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. बी. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. म्हाळदे शिवारातील झुडपांमध्ये पाच ते सहा संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित आरोपी वकार अली अहमद अली उर्फ मोसीन चोरवा (25, रा. नवा आझादनगर), वसीमखान शब्बीरखान उर्फ मोसीन चोरवा (25, रा. गुलशेरनगर), अब्दुल मलीक मोहंमद युसुफ (32, रा. नया इस्लामपुरा) यांना पकडण्यात आले. तर मोहंमद शादाब मोहंमद युसुफ उर्फ सिरीया (रा. गोल्डननगर), रब्बानी व इम्तियाज अप्सरा (पूर्ण नाव माहित नाही) हे तिघे फरार झाले. संशयितांच्या अंगझडतीत एक देशी कट्टा, दोन जीवंत काडतुसे, एक चॉपर, दोन तलवारी, मिरची पावडर, दोरखंड मिळून आला. तर, द्याने शिवारातील जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा टाकून शेख शफीक शेख कलीम, इरफान शेख कय्युम, राजेश शंकर यशोद, मोहनमद वाजीद मोहंमद अनिस, शाम शिवराम खैरनार व अरशद शेख गुलाम शेख या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिसांच्या छापेमारीत तीन दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा हस्तगत appeared first on पुढारी.