नाशिक : पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यास कारावास

कारावास

नाशिक : पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणून त्यांना धक्काबुक्की करीत दुखापत केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास सहा महिने साधा कारावास व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. युवराज राजाभाऊ गोडसे असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संसरी गाव परिसरात २७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी व उपनिरीक्षक सी. के. पाटील, पी. डी. माळी यांना जमावाने धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एल. पी. पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. शिरीष कडवे यांनी कामकाज पाहिले. गुन्हा शाबित झाल्याने सहायक सत्र न्यायाधीश जी. पी. बावस्कर यांनी युवराज यास शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक जे. व्ही. गुळवे, एम. एस. सांगळे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यास कारावास appeared first on पुढारी.