नाशिक : पोलिसांनी भिंतीवर डोके आपटल्याने झाला मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

पोलीस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतनगर परिसरात रवींद्र भांगरे (25, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) या युवकाचा मृत्यू पोलिसांनी भिंतीवर डोके आपटल्याने झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मुंबई नाका पोलिस वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. परंतु रवींद्र हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ हे तपास करीत असल्याचा दावा पोलिसांनी केला. शहर आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री संशयितांची तपासणी करण्यात येत होती. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी भारतनगर परिसरात गेले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, आम्हाला पाहताच रवींद्रने पळ काढला व भिंतीवर आदळल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. आम्हाला पाहून कोण पळाले याची माहितीही नसल्याचा दावा मुंबई नाका पोलिसांनी केला आहे. परंतु त्याच्या नातेवाइकांनी हा दावा फेटाळला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिसांनी भिंतीवर डोके आपटल्याने झाला मृत्यू; नातेवाईकांचा आरोप appeared first on पुढारी.