नाशिक पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पोलिस दलातील १३९ पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदी बढती मिळाली आहे. १८ जूननंतर या अधिकाऱ्यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण कळविले जाणार आहे. नाशिक शहर पाेलिस आयुक्तालयातील तीन तर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एक अशा एकूण चार अधिकाऱ्यांचा या पदाेन्नतीत समावेश आहे.

मागील एक ते दीड वर्षांपासून अनेक पाेलिस घटकांत कार्यरत पाेलिस निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. त्यानुसार पाेलिस महासंचालक कार्यालयाच्या अधिपत्याखाली आस्थापना विभागाचे अपर पाेलिस महासंचालक संजीवकुमार सिंगल यांनी (दि. १३) १३९ पाेलीस निरीक्षकांना पदाेन्नती दिल्याचे आदेश काढले. त्यानुसार, या अधिकाऱ्यांना रिक्त जागांवर सहायक पाेलिस आयुक्त किंवा पाेलिस उपअधिक्षक म्हणूण नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी महासंचालक (डीजी) कार्यालयाने सर्व घटक प्रमुखांना या अधिकाऱ्यांच्या महसुल संवर्ग, पसंती व इतर माहिती येत्या १८ जूनपर्यंत पाठविण्यास कळविले आहे.

नाशिक शहर पाेलीस आयुक्तालयातील पीसीबीएमओबी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष काेंडाजी पवार, दहशतवाद विराेधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शंकर शाहू खटके, नाशिक लाचलुचपत प्रचिबंधक विभागातील विश्वजीत जाधव आणि आयुक्तालयातील कुमार भिकाजी चाैधरी यांना बढती देण्यात आली आहे.

हेही वाचा –