नाशिक : पोलीस अधीक्षक पाटील यांची बदली

नाशिक; पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांची धुळे अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधीक्षक दर्जाच्या २४ अधिकाऱ्यांच्या शासनाने गुरुवारी बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीने नव्याने पदस्थापनाही करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नाशिक ग्रामीणचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू होती. गेल्या वर्षी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच शासनाकडून पाटील यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे पाटील यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या गृह विभागाकडून औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षकपदी नव्याने पदस्थापना करण्यात आली आहे; मात्र त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अधीक्षकपदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती शासनाने केलेली नाही. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामीणच्या अधीक्षकपदी तर गौरव सिंह यांची यवतमाळच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा

The post नाशिक : पोलीस अधीक्षक पाटील यांची बदली appeared first on पुढारी.