नाशिक : पोलीस स्टेशन हद्दीतच गाडीची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

कार चोरीला

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा; नाशिक शहरात वाहन चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. असाच एक प्रकार इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश पूजा अपार्टमेंट मर्चंट बँके जवळ घडला आहे. विश्वनाथ देशमुख यांची इको कार( क्रमांक एम एच 43 ए बी 96 35) रात्री दहा वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोराने चोरून नेली आहे. गाडी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

नाशिक शहरात सध्या चारचाकीसह दुचाकी वाहने चोरून नेल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गाडी चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने नागरिकांकडून पोलिस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलीस स्टेशन हद्दीतच गाडीची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.