
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गृह विभागाच्या आदेशानुसार नाशिक पोलिस आयुक्तालयातील उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांची मंगळवारी (दि. २८) मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयात उपआयुक्त पदावर बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर झालेल्या रिक्त जागेवर अद्याप दुसरे अधिकारी दिलेले नाहीत.
फेब्रुवारी अखेरीस पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसह इतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. त्यात पौर्णिमा चौगुले यांची बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी लवकरच नव्या उपआयुक्तांच्या पदस्थापनेबाबत आदेशाची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात पोलिस आयुक्तालयातील तीन उपआयुक्तांची बदली होऊन नव्याने तीन अधिकारी आले होते. मात्र अनेक महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या चौगुले यांची बदली झाली नव्हती. अखेर २८ फेब्रुवारीला त्यांची बदली करण्यात आली आहे. चौगुले यांनी नाशिकमध्ये गुन्हे, विशेष, मुख्यालय आणि वाहतूक विभागात पोलिस उपआयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती.
हेही वाचा :
- सांगली : पुढारी अॅग्रीपंढरी कृषी प्रदर्शनाचे शिवार सजले
- पुणे : अपहरण करून खून करणार्याला बेड्या
- राज्यात मुलींना शिक्षणसक्ती
The post नाशिक : पौर्णिमा चौगुले यांची वसई-विरारला बदली appeared first on पुढारी.