नाशिक : प्रत्येक पाच मधील एक विमाधारक अटींबाबत अनभिज्ञच

विम्याची कागदपत्रे फक्‍त डिजिटल देणे बंद करा, पॉलिसींच्या छापील प्रती बंद केल्याने विमाधारक हवालदिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागरूकतेचा अभाव, विम्यापर्यंत पोहोचण्यात सर्वसामान्यांसमोरील अडथळे हे भारतात विम्याचा खोलवर शिरकाव न होऊ शकल्याची प्रमुख कारणे आहेत. परंतु भारतात स्वत: विमापॉलिसी घेणार्‍या विमाधारकांतील पाचपैकी एक आरोग्य विमाधारक विम्याच्या मूलभूत अटी, खास शब्दावलीबाबत अनभिज्ञ असल्याची बाब विम्यासंदर्भातील सर्वेक्षणातून उघड झाली. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने क्वालिटी ऑफ इन्शुरन्स लिटरसी इन इंडियाने हा अहवाल प्रकाशित केला आहे. ग्राहकांत सर्वसाधारण विम्याबाबत असलेली माहिती, विम्याबाबत असलेल्या गैरसमजुती यावर त्यात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यासाठी विविध शहरातील सुमारे 732 विमाधारकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. विम्याबाबतची शब्दावली ही पॉलिसीबाबत विमाधारकांत गोंधळ निर्माण करत असल्याचे आढळले.

सर्वेक्षणात आढळल्या या बाबी …
1) 46 टक्के विमाधारकांचा विमा स्वतः उतरविल्याचा दावा
2) 42 टक्के आरोग्य विमाधारकांना एनसीबी, ओपीडी, टीपीएसारख्या लघुशब्दांचा अर्थही माहीत नाही.
3) 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी, पूर्व अथवा पश्चात रुग्णालयातील भरती, ओपीडी कव्हर आदी शब्दांचा अर्थ 48 टक्के विमाधारक स्पष्ट करण्यात अपयशी.
4) पाचपैकी एकही आरोग्य विमाधारक सबलिमीट, डेलीकॅश, फ्री लूक पिरीयेड, रिसेट बेनेफिट अथवा डे-केअर किंवा इनपेशंट प्रोसिजर यांसारख्या व्याख्यांचा अर्थ अचूक सांगू शकले नाहीत.
5) आयडीव्ही अथवा झीरो-डिप यांसारख्या लघुशब्दांचा अर्थ 20 टक्क्यांपेक्षा कमी वाहन विमाधारकांना माहीत असल्याचे आढळून आले.
6) आयडीव्ही, झीरो-डिप, व्यापक विमाकवच आणि रस्त्यावर मिळू शकणार्‍या मदतीसारखी वैशिष्ट्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी वाहन विमाधारकांना पूर्ण माहीत असल्याचे आढळले.
7) थर्ड पार्टी अथवा वाहन विमा हा अत्यावश्यक असतो, ही समज निम्म्याच (49 टक्के) विमाधारकांना ज्ञात आहे.

विमा पॉलिसीशी निगडित अनेक किचकट शब्द असतात आणि ते ग्राहकाला समजणे कठीण असते. वित्तीय समावेशकतेला अधिकाधिक गती देण्यासाठी त्याचबरोबर देशात विम्याची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वित्तीय साक्षरता वाढविणे हे होय. विमा साक्षरतेची दरी वाढविण्यास कारणीभूत असलेल्या अनेक बारीकसारीक गोष्टींवर हा संशोधन अहवाल प्रकाशझोत टाकतो. – संजीव मंत्री, कार्यकारी संचालक, आयसीआयसीआय लोम्बार्ड.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रत्येक पाच मधील एक विमाधारक अटींबाबत अनभिज्ञच appeared first on पुढारी.