नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश

जुने नाशिक www.pudhari.news
नाशिक (जुने नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
जुने नाशिक येथील उर्दू माध्यमाची सर्वात जुनी व प्रतिष्ठित संस्था युज नॅशनल उर्दू हायस्कूल फॉर बॉईज व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सादिक शेख यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती समारंभात शाळा कॅम्पसच्या विकासासाठी देणगी म्हणून दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हाजी बबलू पठाण, उपाध्यक्ष अलीम शेख, सचिव प्रा. जाहीद शेख, सहसचिव एजाज काजी, खजिनदार गौसनूर खान, कार्यकारी सदस्य ॲड. बाबा सय्यद उपस्थित होते.
प्राचार्य सादिक शेख यांच्या या अभिनव कार्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचे कौतुक करून आभार मानण्यात आले. शेख यांच्या पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल शाळा व्यवस्थापन मंडळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे त्यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सादिक शेख यांना एक तोळ्याचे सोन्याचे नाणे, शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. मुख्याध्यापिका शाहीन खान, प्रभारी मुख्याध्यापक तौसिफ शेख, सेंड ऑफ कमिटीचे अध्यक्ष लियाकत पठाण, उपप्राचार्य डॉ. नुरे इलाही शाह, पर्यवेक्षक इरफाना पीरजादा, मुसर्रत शेख, मुख्य लिपिक शाहीन शेख, शगुफ्ता शेख, वाजेदा देशमुख, सईद खान, आरिफ पठाण, अतिक कलादगी, निजाम शेख, रऊफ खान, मुदब्बीर सय्यद आदींनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सेवापूर्ती समारंभ समितीचे सचिव जमीर पठाण यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. आबिद शेख यांनी सूत्रसंचालन केले. नदीम शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास कॅम्पसमधील सर्व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्यासह सत्कारमूर्ती यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश appeared first on पुढारी.