Site icon

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बुधवार (दि.८) रोजी महिला कर्मचारी तसेच ओपीडीसाठी आलेल्या महिलांचा व प्रसूती झालेल्या महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्ताने वेहळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेश पाटील, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. प्रशांत जानकर यांच्यासह कर्मचारी शकील शेख, डी. बी. जगताप, मयूर गायकर, गौरव घोरपडे, उत्तम पावरा आदींनी महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित केल्याने महिला वर्गांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या टी. आर. शिंदे, पी. एस. मोरे, ए. एस. सुरसे, एन. एस. साबळे, एन. के. सोनवणे, सुनिता बुरुकुल, सरिता सानप आदी महिला कर्मचाऱ्यांचा देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
पुरुषाच्या बरोबरीने महिला वर्ग आज काम करत आहेत. येथील महिलांचा देखील सन्मान व्हावा. हा हेतू डोळ्यासमोर ठेवत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांचा सन्मान करण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला त्याबद्दल आनंद वाटतो. – डॉ. जितेश पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वेहळगाव, ता. नांदगांव.

हेही वाचा:

The post नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान appeared first on पुढारी.

Exit mobile version