नाशिक : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने पिंपळनेरमध्ये शिवसेनेच्या वतीने शिंदे सरकारचा निषेध

Nashik ShivSena

पिंपळनेर (ता.साक्री); पुढारी वृत्तसेवा : फॉक्सकॉन-वेदांता कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ युवासेना व शिवसेनेच्या वतीने पिंपळनेर येथे निषेध स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी शिंदे सरकारचा निषेध करत सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख हिम्मत भाऊ साबळे, युवासेना तालुका प्रमुख रमेश शिंदे, शिववाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ पगारे, शिवसेना शहर प्रमुख उदय बिरारी, शहर प्रमुख अतुल चौधरी, उपतालुका प्रमुख कैलास ठाकरे, उपशहर प्रमुख कृष्णकांत पुराणिक, उपशहर प्रमुख महेश वाघ, विभागप्रमुख मनोज खैरनार, युवासेना उपतालुका प्रमुख चिंतामण ठाकरे, युवासेना शहर प्रमुख दिपक साळुंखे, उपशहर प्रमुख मयूर नांद्रे, उपशहरप्रमुख पवन सोनवणे, शाखाप्रमुख अनिल चौरे, राजेश पवार, दिलीप साबळे, नयन बागुल, विशाल ठाकरे, बुधा बागुल, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख जयेश देशमुख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने पिंपळनेरमध्ये शिवसेनेच्या वतीने शिंदे सरकारचा निषेध appeared first on पुढारी.