नाशिक : फोटो काढण्यावरून एकास मारहाण

सांगोला

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील आडवा फाटा परिसरातील हॉटेल तंदूरसमोर फोटो काढण्याच्या वादातून एका तरुणास फरशीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

हॉटेल तंदूरमधून फिर्यादी भूषण नामदेव खाडे (24, रा. मुसळगाव) व मित्र जेवण करून निघाले होते. यावेळी संशयित आरोपी प्रसाद पाटील, प्रथमेश लोंढे, प्रफुल्ल जायभावे (सर्व रा. सिन्नर) यांनी भूषणचे फोटो काढण्यास सुरुवात केली. भूषणने फोटो काढण्यास विरोध केला असता आरोपींनी फरशीने मारून जखमी केले. काहींनी भूषणच्या तोंडावर व पाठीवर मरून शिवीगाळ करून दमदाटी केली. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक चेतन मोरे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : फोटो काढण्यावरून एकास मारहाण appeared first on पुढारी.