
नाशिक: पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसू नये म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ‘मिशन भगिरथी’ असे नाव देण्यात आले आहे. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जर हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाला, तर नक्कीच जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम होईल.
जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाच्या माध्यमातून 12 तालुक्यांत 600 कामे होणार आहेत. या कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा उपयोग करण्यात येणार आहे. मिशन भगिरथी अंतर्गत करण्यात येणार्या कामांची रक्कम अंदाजे 100 कोटी रुपये इतकी आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 12 तालुक्यांतील 100 गावांचा समावेश आहे. पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण आदिवासी भागाचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी रोहयोतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी मिशन भागिरथी हा उपक्रम राबवण्याच्या सूचना जि. प. सीईओ मित्तल यांनी जलसंधारण विभागाला दिल्या होत्या. सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्चित केली आहेत. सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडेारी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगावातील 150 गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावामध्ये पाच ते सहा बंधारे बांधण्यात येणार आहेत. यात पाच ते 30 लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधार्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांचा ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या कामांना ग्रामपंचायत विभागाकडून प्रशासकीय मान्यता दिल्या जातील व मार्चपासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
तालुकानिहाय गावे व कामांची संख्या
तालुका गावे कामे
दिंडोरी 15 64
पेठ 27 74
कळवण 18 60
सुरगाणा 21 114
सटाणा 9 44
देवळा 8 32
इगतपुरी 5 13
त्र्यंबकेश्वर 12 46
चांदवड 10 37
मालेगाव 7 50
येवला 3 15
हेही वाचा:
- ‘सरकारने खारजमीन कायद्यात बदल करणे गरजेचे’
- सैफ अली खान भडकला; युजर्स म्हणाले, फालतू का अॅटिट्यूड! (video)
- ‘सरकारने खारजमीन कायद्यात बदल करणे गरजेचे’
The post नाशिक : बंधार्यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम appeared first on पुढारी.