नाशिक : बकरी ईद निमित्त वाहतूक मार्गात करण्यात आले बदल

वाहतूक मार्गात बदल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – बकरी ईदनिमित्त शहरातील गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे सोमवार (दि.१७) रोजी नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव येणार असल्याने, या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्र्यंबक पोलिस चौकी ते मायको सर्कल, गडकरी चौक ते चांडक सर्कल या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.

वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग म्हणून त्र्यंबक पोलिस चौकीकडून उजवीकडे वळून ठाकरे गल्ली, शालीमार व मेनरोड मार्गे तसेच चांडक सर्कल, संदीप हॉटेल, मुंबईनाका मार्गे इतरत्र जाता येईल. सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, सेंट फ्रान्सिस हायस्कुल टी पॉइंट, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, अण्णाभाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल, सीबीएस सिग्नल, मेळा स्टॅण्ड, टिळकवाडी सिग्नल आदी भागात बॅरिकेटींग करण्यात येणार आहे. वाहतूक मार्गातील हा बदल सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा बदल राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: