नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा

नाशिक : बक्षीस म्हणून महागडी कार लागल्याचे आमिष दाखवून भामट्यांनी पाथर्डी फाटा येथील वृद्धास सुमारे अडीच लाख रुपयांचा गंडा घातला. अभिमन्यू नामदेव माळी (६२, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार १८ ते २६ मे दरम्यान त्यांना गंडा घालण्यात आला.

माळी यांना व्हॉट्सअपवर बक्षिसात कार लागल्याचे सांगत भामट्यांनी त्यांना वेगवेगळ्या शुल्कापोटी २ लाख ५५ हजार ४६२ रुपये घेतले. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यात व्हॉट्सअप क्रमांक धारक व ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्या खातेधारकांविराेधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा appeared first on पुढारी.