नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीस दमदाटी करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व १८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आकाश कन्हैया लोणारे (२०, रा. शिवाजीनगर, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. आकाशने नाेव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती शाळेत जात असताना आकाश याने ९ नोव्हेंबर २०१८ ला सिन्नर येथील लोंढे गल्ली परिसरातून बळजबरीने नेत माेहदरी घाटाजवळ अत्याचार केला. तसेच तुझ्या भावास जीवे मारेल अशी पीडितेला धमकी दिली. त्यानंतर आकाशने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. जानेवारी २०१९ मध्ये पीडितेचे सिन्नर बसस्थानकातून अपहरण करीत गुजरात राज्यात नेले. तिथे लग्न केल्याचे भासवून अत्याचार केले. या प्रकरणी आकाशविरोधात सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचार, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आकाशला अटक केली, तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यानुसार गुन्हा शाबित झाल्याने विशेष न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आकाशला बलात्कार, अपहरण प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.