नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू

रस्ते अपघात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर-घोटी महामार्गावर हरसूल फाटा शिवारात शनिवारी (दि.21) सायंकाळच्या सुमारास बल्करच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

शहापूर तालुक्यातील खर्डी येथील संतोष भोईर (57) व अरविंद लहू विसे (58) मोटरसायकलने (क्र. एम. एच. 04/ ए. व्ही. 6720) घोटीकडून सिन्नरकडे येत असताना हरसूल फाटा शिवारात समोरून येणाऱ्या बल्कर या अवजड वाहनाने. (टी. एन। 37/ डी. वाय. 9523) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात संतोष भोईर हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले तर अरविंद विसे हे किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिकांनी मदत करत शहरातील श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिका चालक गणेश काकड यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, संतोष भोईर यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळी येत दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला लावून घेऊन वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक एस. डी. गायकवाड अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.