नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी रवींद्र भोयेंची बिनविरोध निवड

म्हसरूळ (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी रवींद्र भोये यांची बिनविरोध निवड करण्यात आली. युवराज कोठुळे यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्याच्या निवडीची प्रक्रिया मंगळवार (ता.१७) रोजी पार पडली. रवींद्र भोयेंनी बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.   

एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड

मंगळवार (ता. १७) रोजी सकाळी साडे दहा वाजता सभापती देविदास पिंगळे, रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, शंकरराव धनवटे, प्रभाकर मुळाणे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, संपतराव सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, जगदीश अपसुंदे, चंद्रकांत निकम, संदीप पाटील, शाम गावित, ताराबाई माळेकर, विमल जुंद्रे हे बाजार समितीमध्ये दाखल झाले. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात करण्यात आली. उपसभापती पदासाठी रवींद्र भोये यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी बाजार समिती सचिव अरुण काळे, बांधकाम अभियंता रामदास रहाडे, सहायक सचिव आर एन घोलप व जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील राजेश आव्हाड उपस्थित होते.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

सभापती देविदास पिंगळे व सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकत ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील सदस्यास न्याय दिल्याबद्दल मनस्वी आभार मानतो. सभापती व संचालक मंडळा समवेत कामकाज करीत पेठ हरसुल, त्रंबक या उपबाजाराचा विकास साधत शेतकरी हितावह काम करील. - रवींद्र भोये, उपसभापती, नाकृउबा समिती

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला