
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सज्ज रहावे. बाजार समितीवर यावेळी राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी झोकून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले.
गणूर चौफुलीवरील शासकीय विश्रामगृहावर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खंडेराव आहेर, विजय जाधव, सुनील कबाडे, दत्तात्रय वाघचौरे, अरुण न्याहारकर, अनिल काळे, रावसाहेब भालेराव, बाकेराव जाधव, विजय गागुंर्ड, प्रकाश शेळके, रंगनाथ थोरात, मधुकर टोपे, वसंत पगार, परसराम निकम, राजेंद्र ठोंबरे, राजाभाऊ पगारे आदी उपस्थित होते. बाजार समिती अन् शेतकरी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतकर्यांशिवाय बाजार समिती अन् बाजार समितीशिवाय शेतकरी हे समीकरण कोणीही बदलवू शकत नाही. यामुळे बाजार समितीत येणार्या शेतकर्यांना आंतरराष्ट्रीय दर्जासारख्या सुख-सुविधा देणे आवश्यक आहे. बाजार समितीत शेतकर्यांना सोसाव्या लागणार्या समस्या कायमच्या दूर होतील. निवडणुकीसाठी तालुक्यातील बूथनिहाय बैठका घेण्यात येतील, असे मत डॉ. गायकवाड यांनी मांडले. यावेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस म्हसू गागरे, रघुनाथ आहेर, अशोकराव शिंदे, अमोल भालेराव, तुकाराम पगार, सुभाष शिंदे, संजय भांबर, शैलेश ठाकरे, अनिल पाटील, विक्रम जगताप, अनिल ठोके आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- कोपरगाव : बाजार समितीतील शेतमाल विक्री सुरू; स्नेहलता कोल्हे यांनी घडविला समेट
- मंचर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव; नवीन कांद्याची आवक सुरू
- कांदा बाजारभावात तेजी…! घोडेगाव बाजार समितीत 2300 रुपये उच्चांकी भाव
The post नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी appeared first on पुढारी.