नाशिक; पुढारी वृत्तसेवा : गंगापूर रोडवरील बारदान फाटा चौफुलीजवळ भरधाव कारचे टायर फुटून कार चालकाचा ताबा सुटला. कार रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
बारदान फाटा येथे झालेल्या अपघातातील मृतांमध्ये एक तरुण व एका तरुणीचा समावेश आहे. रिद्धी प्रशांत गुजराती (18, रा. हिरावाडी रोड, खोडे नगर) व नीरज रवींद्र धारणकर (18, द्वारका काठे गल्ली) अशी मृतांची नावे आहेत. तर कार चालक आर्यन फडकर व मृण्मयी अहिरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
The post नाशिक : बारदान फाटा येथे कारचे टायर फुटल्याने अपघात; दोन ठार appeared first on पुढारी.