Site icon

नाशिक : बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नांदगाव शिक्षण विभाग सज्ज

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

येत्या मंगळवार, दि. २१ फेब्रुवारीपासुन सुरु होणाऱ्या ईयत्ता १२ वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी नांदगावचा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. विभागातर्फे बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आले असून परीक्षा केंद्रावर प्रविष्ठ शाळांना वगळून तालुक्यातील अन्य शाळांमधील शिक्षकांची नेमणूक पर्यवेक्षक म्हणून करण्यात येणार आहे. तालुक्यातील एकूण परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा होणार असून ३०६८ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. तर करीयरच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याने पालक तसेच समाज घटकांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असणार आहे.

एकूण परीक्षा केंद्र: ६
एकूण परीक्षा देणारे विद्यार्थी संख्या : ३०६८ विद्यार्थी
एकूण पर्यवेक्षक: १२४
एकूण केंद्र संचालक- ६

तालुक्यातील परीक्षा केंद्राची ठिकाण आणि परीक्षा विद्यार्थी संख्या अशी….

१) कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव. परीक्षार्थी विद्यार्थी संख्या: ७८८

२) महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड. परीक्षार्थी विद्यार्थी संख्या: ५७०

३) लोकनेते कै. ॲड वि.शि. आहेर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, न्यायडोंगरी. परीक्षार्थी विद्यार्थी संख्या: २७२

४) व्ही. . एन. नाईक उच्च माध्यमिक विदयालय, वसंतनगर, पो. जातेगाव. परीक्षार्थी विद्यार्थी संख्या: ४५२

५) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, वेहेळगांव. परीक्षार्थी विद्यार्थी संख्या: ६७४

६) एच. ए. के. हायस्कुल एन्ड ज्यु. कॉलेज मनमाड . परीक्षार्थी विद्यार्थी संख्या: ३१२

परीक्षा कालावधीत भरारी पथकांमध्ये तहसीलदार, महसुल कर्मचारी यांचे प्रत्येक केंद्रावर तालुक्याचे पथक राहणार असून गटविकास अधिकारी व पंचायत समिती कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.

बारावीची परीक्षा सहा केंद्रावर घेण्यात येणार असून कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच पर्यवेक्षक देखील केंद्र बदलून देण्यात येणार आहेत. त्यामुळे निकोप वातावरणात परीक्षा होणार आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर दक्षता समितीही स्थापन करण्यात आली आहे.– प्रमोद चिंचोले, गट शिक्षण आधिकारी, नांदगाव.

हेही वाचा:

The post नाशिक : बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नांदगाव शिक्षण विभाग सज्ज appeared first on पुढारी.

Exit mobile version