नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

हरिष सुधाकर देवरे www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सुराणे येथील हरिष सुधाकर देवरे (१९) या बारावीतील विद्यार्थ्याचा शुक्रवारी (दि.३) सायंकाळी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

हरिष सायंकाळी ४ च्या सुमारास शेततळ्याजवळ काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचा हरिष हा एकुलता एक मुलगा होता. त्याची बारावीची परीक्षा सुरू होती. कुटुंबीय व आजूबाजूंच्या शेतकऱ्यांनी त्याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढून नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. बिजोटे येथील श्री विघ्नहर्ता एज्युकेशन सोसायटीचे संस्थाचालक अमोल जाधव यांचा तो मामेभाऊ होत.

हेही वाचा:

The post नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.