नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

abhiwadan www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाइतके उत्तुंग होते. सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत त्यांचा दबदबा होता. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी करत शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालिमार येथील कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रतिमापूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकविले. त्यांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, असे उपनेते सुनील बागूल यांनी आपल्या अभिवादनपर भाषणात सांगितले. शिवसेना नसती तर मराठी माणूस दूर फेकला गेला असता. बाळासाहेब उत्कृष्ट वक्ते, व्यंगचित्रकार होते. खास ठाकरे शैलीतील त्यांचे भाषण ऐकतच राहावेसे वाटे, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितले. आपण सन्मानाने जगतो ते शिवसेनेमुळेच असे सांगत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास माजी महापौर विनायक पांडे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, युवा सेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, महेश बडवे, सचिन मराठे, देवानंद बिरारी, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर, शोभा गटकळ, मंगला भास्कर, मंदा दातीर, श्यामला दीक्षित, माजी महापौर नयना घोलप, यतीन वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन appeared first on पुढारी.