Site icon

नाशिक : बिटकोच्या कॅडेट्सने अनुभवला विमान उड्डाणाचा थरार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनतर्फे पुणे हवाई दल विमानतळ येथे विमान उड्डाण शिबिरात जेडीसी बिटको इंग्लिश हायस्कूलच्या एअर विंगच्या सार्जन्ट समर्थ बागूल, कार्पोरेल ध्रुव पुजारी आणि कॅडेट हर्ष जगताप यांनी सहभाग घेत प्रशिक्षण विमानातून प्रत्यक्ष विमान उड्डाणाचा थरार अनुभवला.

संक्रांतीला आबालवृद्ध पतंग उडविण्याचा आनंद घेत असताना या विद्यार्थ्यांनी प्रथमच लष्करी विमानातून हवाई उड्डाणाचा अविस्मरणीय अनुभव घेतला. डबल सिटर ट्रेनिंग विमानात ग्रुप कॅप्टन संग्राम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली को-पायलट होऊन या विद्यार्थ्यांनी आकाशभरारी घेतली. एनसीसी ऑफिसर देवेंद्र हातखंबकर यांनी 32 मिनिटे, कॅडेट ध्रुव आणि समर्थने 23 मिनिटे, हर्षने 21 मिनिटे पुणे परिसरात उड्डाण केले. याचबरोबर विद्यार्थ्यांना भारतीय वायू दलातील अंत्यत शक्तिशाली अशा सुखोई -30 या लढाऊ विमानाला व एम आय-17 या लढाऊ हेलिकॉप्टरला पाहता आले. सार्जन्ट आलोक श्रीवास्तव, अनुप कुमार, देवेंद्र हातखंबकर यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक दावल नंदन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा :

The post नाशिक : बिटकोच्या कॅडेट्सने अनुभवला विमान उड्डाणाचा थरार appeared first on पुढारी.

Exit mobile version