नाशिक : बिबट्याचा पादचारी नागरिकांवर जीवघेणा हल्ला

नाशिकरोड , पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवसापासून नाशिक रोड परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत सुरू आहे. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे बिबट्याने येथील आनंद नगर भागात नागरिकांना दर्शन दिले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्द्ध आहे. रविवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमाराला येथील कदम लॉन्स जवळ रस्त्याने पायी जाणाऱ्या राजू शेख या व्यक्तीवर बिबट्याने जीव घेणा हल्ला केला. तो भालेकर मळा येथील रहिवासी असून गुरुदेव गॅस एजन्सी मध्ये कामाला आहे. रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास राजू शेख रस्त्याने पायी जात असताना बिबट्याने प्रचंड वेगाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देवळाली कॅम्प नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोड परिसरातील बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून वन विभागाने तातडीने याची दखल घेऊन पिंजरा लावावा तसेच बिबट्याला जर बंद करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी त्यांच्या प्रभागातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभे केले आहे. त्यामुळे बिबट्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वन विभागाला मदत मिळाली आहे.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : बिबट्याचा पादचारी नागरिकांवर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.