नाशिक : बिबट्याची मृत्यूशी झुंज अपयशी, रात्रभर पोहून थकल्यानंतर मृत्यू

पोहून थकल्यानंतर बिबट्याचा मृत्यू,www.pudhari,news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील दगडवाडी (गुळवंच) येथील भाऊसाहेब लक्ष्मण साबळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये शुक्रवारी (दि. 28) एक ते दोन वर्ष वयाची मादी बिबट्या विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढळून आली.

परिसरातील एक महिला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाणी ओढण्यासाठी विहिरीत गेली होती तेव्हा मादी बिबट्या विहिरीत पडल्याचे तिच्या लक्षात आले.

नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम समवेत वनपरिमंडळ अधिकारी एस. एम. बोकडे, वनरक्षक एस.एल. गीते, जी. बी. पंढरे, वन कर्मचारी बालम शेख, रोहित लोणारे व प्राणी मित्र निखिल वैद्य यांच्या सहकार्याने सदरची बिबट्याच्या मादीला मोहदरी (माळेगाव) वन उद्यानात नेण्यात आले. रात्रीच्या सुमारास विहिरीत पडल्यानंतर १० ते १२ फूट पाण्यात रात्रभर पोहून थकल्यानंतर मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा वन विभागाचा अंदाज आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बिबट्याची मृत्यूशी झुंज अपयशी, रात्रभर पोहून थकल्यानंतर मृत्यू appeared first on पुढारी.