
नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात कोळगाव माळ रस्त्यावर नरोडे वस्ती जवळ रविवारी (दि. 18) दुपारी 3.30 च्या सुमारास उसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोन तरूणांवर हल्ला केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बिबट्याने पाथरे कोळगाव माळ शिवारात तरुणांवर हल्ला चढवल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाथरे कोळगाव रस्त्यावर सचिन वाळीबा नरोडे यांच्या वस्तीवर उसाच्या रानात श्रीहरी साहेबराव नरोडे (32) यांच्यासह दोन तरुण काम करीत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्यात श्रीहरीच्या तोंडावर, हातापायावर जबर जखमा झाल्या असून त्याने जीव वाचवण्यासाठी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने शेजारच्याच उसाच्या शेतात धूम ठोकली. श्रीहरी याचा साथीदार या हल्ल्यातून बचावला. सोबत असलेल्या तरुणांनी श्रीहरी यास गावातील रुग्णालयात नेऊन त्यावर उपचार केले. सध्या श्रीहरी नरोडे यांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा:
- भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले
- पिंपरी : लघुउद्योजकांसमोर समस्यांचा डोंगर
- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला कोठडी
The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी appeared first on पुढारी.