नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगा ठार

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा :  दिंडोरी तालुक्यातील निळवंडी शिवारात आज (दि.११) सायंकाळी एका आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. गुरु खंडू गवारी (वय ८वर्षे ) असे या मुलाचे नाव आहे.

तालुक्यातील दिंडोरी येथे आज सकाळी मेंढपाळावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच सायंकाळी निळवंडी शिवारात गुरु गवारी या मुलावर बिबट्याने अचानक झडप घालून हल्ला केला. व त्याला घरालगत असलेल्या उसात उचलून नेले. झालेल्या गंभीर हल्ल्यात गुरुचा जागीच मृत्यू झाला. दिवाळीच्या पूर्वसंध्याला झालेल्या दुर्देवी घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभागासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मुलाचा मृतदेह दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

हेही वाचा : 

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगा ठार appeared first on पुढारी.