नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त

बिबट्या www.pudhari.news
नाशिक (पिंपळगाव बसवंत)  : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील असलेल्या मुखेड शिवारात शरद शेळके आणि कैलास सताळे आणि शांताराम पवार यांच्या यांच्या मळात भरदिवसा कुत्र्यावर हल्ला करत बिबट्याने तो फस्त केला. हा प्रकार शेळके यांनी पाहताच आरडाओरडा केल्यावर बिबट्याने तेथून धूम ठोकली. पण बिबट्याच्या हल्ल्याने कुत्रा चांगलाच जखमी झाल्याने तो मयत झाला असून . परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत असून सतर्क राहण्याचे आवाहन  मुखेड ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने केले आहे.
मुखेड येथे तीन बिबटे तेथील शेतकरी वर्गाला दिसले असून  पिंपळगाव बसवंत शहराचा देखील महादेव वाडी हा परिसर मुखेड शिवाला  लागून आहे शिवाय महादेववाडी ही पाराशरी नदी काठी वसलेली वस्ती असून बिबट्याचा धोका जास्त आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता राखावी. – भास्कराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत.
रविवार, सोमवार तसेच मंगळवारी असे तीन दिवस बिबट्याचे दर्शन होत असून एक नव्हे तर तीन बिबटे असल्याचा अंदाज गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिबटे दिवसेंदिवस गावात व मळ्यातील कुत्रे बिबट्या फस्त करत आहेत. आतापर्यंत जवळपास तीन कुत्र्यांचा मृत्यू या हल्ल्यात झाला आहे. वनविभाग आणि पशु वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. मुखेड गावात बिबट्याचा वावर वाढला असल्याने पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचा घटना वाढत आहेत. त्यामुळे वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकापेक्षा अधिक पिंजरे लावावे अशी मागणी सरपंच अमोल जाधव यांनी केली आहे.
मुखेड गावात बिबट्यांचा वावर वाढला असून शेतकरी व मजूर वर्गाने काळजी घ्यावी तसेच वन विभागाने देखील गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर  परिसरात असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे वाढवावे ही विनंती. – अमोल जाधव, सरपंच मुखेड ग्रामपंचायत.

हेही वाचा:

The post नाशिक : बिबट्याने केले मळ्यातील कुत्रे केले फस्त appeared first on पुढारी.