नाशिक : बेकायदेशीररित्या फटाक्यांची व्रिकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अनधिकृत फटाके विक्री,www.pudhari.news

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या फटाक्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशिरपणे फटाक्यांचा स्टॉल लावून २५ लाख रूपयांच्या फटाक्यांची विक्री करणाऱ्या गणेश नंदकिशोर खराडे ( वय ४०, रा. जेलरोड, नाशिकरोड) याच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गणेश खराडे याने शिक्रेवाडी बस स्टॉपजवळील अंबा सोसायटी परिसरात फटाका डेपो नावाचा स्टॉल लावला होता. मात्र हा स्टॉल लावताना त्याने महापालिका, पोलीस विभाग, अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच त्याने परिसरात फटाका विक्रीचे मोठे होर्डींगही लावले होते. मनाई आदेशाचे पालन न करता तो फटाक्यांची विक्री करीत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी २४ लाख ६२ हजार ६९० रूपये किमतीचे फटाके ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली.

हेही वाचा : 

The post नाशिक : बेकायदेशीररित्या फटाक्यांची व्रिकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.