
नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक बेमुदत पुकारलेल्या संपात सहभागी झाले आहेत. दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकून त्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग नोंदविला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांना कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी लेखी निवेदन देत संपाला सुरुवात केली आहे. राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना नोव्हेंबर २००५ पासून बंद केली आहे. त्याऐवजी डीसीपीएस, एमपीएस योजना सुरु केली आहे. तीला विरोध करून पुन्हा पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागु करावी. या मागणीसाठी राज्यातील विविध संघटनांनी मंगळवार (दि.14) पासून बेमुदत संप जाहीर केला आहे. त्यात एसव्हीकेटी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील शिक्षक सहभागी झाले आहेत. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ. एस. के. शिंदे, राजीव बच्छाव कैलास पवार, राजाराम थोरात, नंदलाल जाधव, देवराम ढोली, संजय पगार, सुनिता कापडी एम. एस. निकम. एस. बी. सोनवणे. ए.एस. लोमटे आदींनी सहभाग नोंदविला.
मागील काही वर्षांपासून राज्य सरकारकडे आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी वारंवार करीत आहे. मात्र अजूनही याविषयी ठोस निर्णय घेतलेला नाही. याविषयी आता ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर त्यास शासन स्वतः जबादर राहील. – एस. के. शिंदे, प्रदेशाध्यक्ष, कनिष्ठ शिक्षक विभाग .
हेही वाचा:
- वाशिम : जुनी पेन्शनच्या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट; कामकाज ठप्प
- INDvsAUS ODI Series : कसोटीनंतर वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला धक्का, संघाचा कर्णधार बदलला
- जॅकलिन फर्नांडिसने ऑस्कर आफ्टर पार्टीमध्ये लावले चारचाँद
The post नाशिक : बेमुदत पुकारलेल्या संपात एसव्हीकेटीचाही सहभाग appeared first on पुढारी.