नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
येथील उत्तमनगर येथे एका गिरणीच्या पाठीमागे बेवारस दोन पिशव्यांमध्ये १३ किलो चांदी व पितळ असे एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना सापडला.
उत्तमनगर येथील काँग्रेसचे पदाधिकारी माणिक जायभावे यांच्या गिरणीच्या पाठीमागे दोन बेवारस पिशव्या ठेवलेल्या असल्याचा फोन जायभावे यांना आला होता. त्यांनी त्वरित याबाबत पोलिसांना माहिती देताच अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिशव्या तपासल्या असता त्याच्यात 13 किलो चांदी व पितळ असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल आढळला. हा मुद्देमाल भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून संशयितांनी त्याठिकाणी ठेवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी हा मुद्देमाल भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या सुपूर्द केला. भद्रकाली पोलिस या प्रकरणाशी संबंधित चोरट्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
- पुणे : गुंजवणी प्रकल्पाचे काम बंद; जलवाहिन्यांची जोडणी पावसामुळे थांबविल्याचा दावा
- पिंपरी-चिंचवडमध्ये स्कूलबस चालकांकडून नियमांना ‘ठेंगा’
- पुणे : गुंजवणी प्रकल्पाचे काम बंद; जलवाहिन्यांची जोडणी पावसामुळे थांबविल्याचा दावा
The post नाशिक : बेवारस पिशव्यांमध्ये सापडली दहा लाखाची चांदी appeared first on पुढारी.