नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड

बोनस

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनने अंबड व सातपूर औद्योगिक वसाहत तसेच नाशिक जिल्ह्यात 18 कंपन्यांमध्ये बोनसबाबत यशस्वी करार केल्याने कामगारांना उत्तम रक्कम मिळाल्याची माहिती सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी दिली.

दिवाळी सणापूर्वी बोनसची रक्कम मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोनस रक्कम मिळाल्याने खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. युनियनचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस सीताराम ठोंबरे, चिटणीस संतोष काकडे, उपाध्यक्ष देवीदास आडोले, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार यांनी करारासाठी पुढाकार घेतले आहेत.

सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनने अंबड औद्योगिक वसाहतीत 13 कंपन्यांमध्ये यशस्वी बोनस करार केले आहेत. त्या पुढीलप्रमाणे : 1. कॅपिटल फूड्समध्ये एक महिन्याचे पूर्ण वेतन, 2. एम्पायर स्पाइसेस अकरा टक्के, 3. आर्टसन इंजिनिअरिंग 8.33 टक्के, 4. तुषार प्रिसिकॉन 35 दिवसांचा पूर्ण पगार, 5. सुविधा इंजिनिअरिंग इंडस्ट्रिज एक महिन्याचा पूर्ण पगार, 6. ल्युसी ईलेमध्ये 35 हजार 500 रु., 7. आर डी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड पंधरा टक्के, 8. नाशिक ऑटोटेक 20 टक्के, 9. देवी एंटरप्रायजेस 20 टक्के, 10. रिलायबल ऑटो टेक 20 टक्के, 11. ग्लोबटेक मेटल क्राफ्ट एक महिन्याचा पूर्ण पगार, 12. तुषार इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड 35 दिवसांचे पूर्ण वेतन, 13. सुमो ऑटो टेक प्रायव्हेट लिमिटेड रुपये सोळा हजार पाचशे.

या कंपन्यांत झाला करार…..
सातपूर औद्योगिक वसाहतीत पाच कंपन्यांमध्ये यशस्वी बोनस करार झाले. यात 1. जैनिक्स इंजिनिअरिंग रुपये 38 हजार, 2. सिंग इंजिनिअरिंग एक महिन्याचा पूर्ण पगार, 3. इंटेक्स कंट्रोल दीड महिन्याचा पूर्ण पगार, 4. ऑबिटल सिस्टीम बॉम्बे 38 हजार 600, 5. युनायटेड इंजिनिअरिंग 13 टक्के.

हेही वाचा:

The post नाशिक : बोनसमुळे 18 कंपन्यांच्या कामगारांची दिवाळी गोड appeared first on पुढारी.