नाशिक : ब्राह्मणवाडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालीका ठार

leopard

ञ्यंबकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे साडे तीन वर्षाची बलिका बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली.  बुधवारी रात्री घडलेल्या या घटननेने गावात एकच खळबळ माजली.

बुधवारी (दि. १५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराच्या अंगणात आलेल्या नयना नवसु कोरडे या बालीकेला अंधारातुन आलेल्या बिबटयाने पळवले. घरातील माणसांनी आरडाओरडा करत पाठलाग केला मात्र काही मिटर अंतारावर बिबटया नयनाला टाकुन पळाला.मानेवर जखम झालेली नयना जागीच गतप्राण झालेली होती.माहिती मिळताच पोलीस नीक्षक बिपीन शेवाळे,वनपरिक्षेत्र अधिकारी आदी जागेवर हजर झाले.बालीकेचा मृतदेह ञ्यंबक ग्रामिण रूग्णालयात आणला होता. धुमोडी,वेळुंजे आणि यावेळेस ब्राह्मणवाडे असे एकाच परिसरातील गावांमध्ये आता पर्यंत तीन बालके बळी गेले आहेत.

The post नाशिक : ब्राह्मणवाडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालीका ठार appeared first on पुढारी.