
नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा
घंटागाडीतील भंगार मला का विकत नाही या कारणावरून श्रमिक नगर येथील एका सराईत गुन्हेगाराकडून घंटागाडी कर्मचाऱ्याला गेल्या दोन दिवसापासून मारहाण होत असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
श्रमिकनगर परिसरात घंटागाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या चेतन भुजबळ यास गेल्या दोन दिवसापासून भंगार व्यवसायिक असलेल्या साजन नामक व्यक्तीकडून मारहाण होत आहे. दरम्यान आज बुधवार (दि. 3) सकाळी घंटागाडी कर्मचारी चेतन भुजबळ हे आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी जात असताना चार जणांच्या टोळक्याने रॉड तसेच चोपर ने त्यांच्यावर हल्ला केला. गाडीतील भंगार मला का विकत नाही अशी विचारणा करुन व्यावसायिकाने मारहाण तर केलीच याशिवाय भंगार मला न विकल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही भंगार व्यवसायिकाने घंटागाडी कर्मचा-याला दिली आहे.
दरम्यान मनपा प्रशासन व घंटागाडी ठेकेदार या प्रकरणाकडे किती गांभीर्याने बघतील हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी घंटागाडी कर्मचा-यांनी केली आहे.
हेही वाचा :
- पिंपरी : वेतनवाढीपासून सुरक्षारक्षक वंचित
- नाशिक : माध्यमिक शिक्षकांना आता दरमहा एक तारखेलाच वेतन
- नगर : डाव्या शेतमजूर संघटनेच्या वतीने निदर्शने
The post नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण appeared first on पुढारी.