नाशिक : भगूर अर्बन सोसायटीवर सहकार पॅनलचे वर्चस्व

देवळाली www.pudhari.news

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

भगूर अर्बन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलला पराभूत करत सहकार पॅनलने 15 जागेवर विजय मिळवत वर्चस्व निर्माण करत सत्ता काबिज केली आहे.

भगूर अर्बन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय अप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अंबादास कस्तुरे विद्यमान शहरप्रमुख विक्रम सोनवणे मार्गदर्शनाखाली सहकार पॅनल तर मनसे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सर्व पक्षीय मिळून भाजप भगुर देवळाली कॅम्प मंडळ अध्यक्ष प्रसाद अंबादास आडके व मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल असे दोन पॅनलमध्ये सरळ लढत होऊन सहकार पॅनलने परिवर्तन पॅनलला पराभूत करत एकूण 15 जागेवर विजय मिळवला आहे. त्यात सहकार पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते सर्व साधारण गट पांडुरंग आंबेकर 1264, विजयी सुरेश करंजकर 1098, दत्तात्रय कुंवर 1230, मनोहर गायकवाड 1090, प्रमोद घुमरे 1198, संजय जाधव 1235, शाम ढगे 1185, संभाजी देशमुख 1135, राजेंद्र फुलपगार 1127, मंगेश बुरखे 1188, विशेष मागासवर्ग मध्ये उमेश मोहिते 1251, अनुसूचित जाती जमाती मध्ये राजेंद्र जाधव 1321, महिला राखीवमध्ये ज्योती करंजकर 1192, मोहिनी वालझाडे 1185, इतर मागासवर्गीयमध्ये शंकर करंजकर 1351 तर परिवर्तन पॅनलचे पराभूत उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटात अंबादास आडके ८४८, प्रवीण कस्तुरे ७१७, गणेश कासार ६०४, महेश गायकवाड ६०२, विलास घोलप ६८७, सुमित चव्हाण ८७०, श्याम देशमुख ७०४, दिनकर पवार ५४१, श्याम वालझाडे ७७९, निलेश हासे ८००, विशेष मागासवर्गामध्ये मधुकर कापसे ७६८, अनुसूचित जाती जमातीमध्ये जालिंदर सुर्यवंशी 688, महिला राखीवमध्ये मीना आडके 804, अनिता चव्हाण 739, इतर मागासवर्गीयात राजेश गायकवाड 673 याप्रमाणे मते पडली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. कासार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संस्थेचे सचिव अनिल शिंदे यांनी कामकाज बघितले. तर नुतन संचालक मंडळाचा भगुर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर, दिपक बलकवडे, गणेश महाराज करंजकर, काकासाहेब देशमुख, रंगनाथ करंजकर, नितीन करंजकर, भाऊसाहेब शिरोळे, निवृत्ती काळे, वैभव ढगे, सोमनाथ आहेर आदिंसह पॅनलच्या पदाधिका-यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भगूर अर्बन सोसायटीवर सहकार पॅनलचे वर्चस्व appeared first on पुढारी.