
[/author
वणी -सापुतारा रस्त्यावरील चौसाळे फाटा येथे भरधाव वेगातील अनियंत्रित कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात त्यास हलविण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, सोमनाथ मोतीराम गांगोडे (वय 28), रा. तिसगाव, ता.दिंडोरी यांची शेतजमीन मांजरपाडा परीसरात असल्याने रविवारी रात्रीच्या सुमारास MH 15 JF 0994 या क्रमांकाच्या दुचाकीवरून वणी सापुतारा रस्त्यावरून जात असताना चौसाळे फाट्यावळ समोरुन भरधाव वेगात एक कार आली व या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात सोमनाथ गांगोडे हे गंभीर जखमी झाले. सोमनाथ यांना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
वणी सापुतारा रस्त्यावर सातत्याने अपघात होत असून बेदरकार व बेफिकीर वाहन चालकांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- कर्जत : तुकाई उपसा सिंचन योजना पूर्ण करा; 7 सप्टेंबर रोजी रास्तारोको
- संतापजनक! मध्य प्रदेशमध्ये जमावाकडून दलित तरुणाची हत्या, आईला विवस्त्र करुन मारहाण
The post नाशिक : भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीचालक गंभीर appeared first on पुढारी.