नाशिक : भांडणाची कुरापत काढून युवकाचा खून

रवी सलीम सय्यद www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकाची खून झाल्याची घटना शनिवार (ता.१०) रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास मायको दवाखाना कालिकानगर येथे घडली. रवी सलीम सय्यद (१८, मायको दवाखाना पाठीमागे, कालिकानगर, दिंडोरी रोड) असे मयताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत रवी सय्यद हा आई वडिलांसमवेत मायको दवाखाना परिसरात वास्तव्यास होता. तसेच दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डामध्ये हमालीचे काम करत होता. त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या किरण कोकाटे (२२, मायको दवाखाना पाठीमागे गल्ली न.४, दिंडोरी रोड) व त्यांचा भाचा यांचे समवेत १५ दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाची कुरापत काढण्याच्या तयारीत संशयित किरण कोकाटे होता. शनिवार (दि.१०) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित किरण व त्याचा भाचा याने मयत रवी सय्यद यास कालिकानगर येथे गाठून त्याचेवर धारधार शस्त्राने वार केले आणि संशयित फरार झाले. जखमी रवी यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी रवी सय्यद यास मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शासकीय रुग्णालय व घटनास्थळी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे, गुन्हे शोध पथक सहायक पोलिस निरीक्षक सत्यम पवार यांनी जाऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस करीत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भांडणाची कुरापत काढून युवकाचा खून appeared first on पुढारी.