
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड भाजप मंडलतर्फे जेलरोडच्या बालाजी सीएनजी येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते संजय किर्तने यांनी अटलजींच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी संयोजक राजेश आढाव, सुनील आडके, अण्णा आढाव, सचिन हांडगे, अशोक सातभाई, रामदास गांगुर्डे, विजय लोखंडे, राम वाघ, गणेश सातभाई, धनंजय इखनकर, ॲड. शरद आढाव, अमित शुक्ल, ओमकार लभडे, विशाल पगार, शांताराम घंटे, संदीप कारवाल, रवी शिंदे, ज्ञानेश्वर भोर, शिवाजी आढाव, प्रकाश आढाव, कपिल खर्जुल, हर्षद आढाव, यश आढाव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमित शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. शरद आढाव यांनी आभार मानले.
हेही वाचा:
- नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा – राष्ट्रवादी
- Heeraben Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन रुग्णालयात दाखल
- Winter session of Maharashtra : हिवाळी अधिवेशनाचे ३० डिसेंबरलाच सूप वाजणार
The post नाशिक : भाजपतर्फे जेलरोडला अटलजींना आदरांजली appeared first on पुढारी.